महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर घर सोडून निघालेल्या महिलेच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत तिचा विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर त्यातील एकीला अटक करण्यात आलेली आहे . त्रयस्थ व्यक्तींनी तिला सहारा दिलेला होता मात्र तिचा लाखो रुपयात सौदा होणार आहे हे लक्षात आल्यानंतर तिने हा डाव हाणून पाडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील हे प्रकरण असून पतीसोबत भांडण झाल्यानंतर 9 जून रोजी ही महिला घरातून निघाली होती त्यावेळी तिची ओळख ममता राहुलकर ( राहणार मोहाडी ) हिच्या सोबत झाली . ममताने तिला स्वतःच्या घरी नेले आणि त्यानंतर हरी शेंडे ( वय 55 राहणार पारडी ) याच्या स्वाधीन केले. हरी याने तिला ललिता दामले ( राहणार खैरबुडी जिल्हा गोंदिया ) हिच्या घरी नेऊन सोडले आणि त्यानंतर ती 19 जूनपर्यंत ती तिथेच होती.
ललिता हिच्या घरी आलेला अनोळखी व्यक्ती आपला सौदा लाखो रुपयात करणार असल्याचे या विवाहितेच्या लक्षात आले आणि त्यानंतर तिच्या मनात भीती निर्माण झाली. रात्री ती पळून जाऊ शकते याचा अंदाज आल्यानंतर तिला रात्री गुंगीचे औषध दिले जात होते हा देखील प्रकार तिच्या लक्षात आला. तिचे बनावट आधार कार्ड देखील आरोपींनी बनवून घेतलेले होते त्यानंतर 19 जून रोजी रात्री अकरा वाजता विवाहित महिलेने ललिता हिचा फोन घेऊन त्यावरून खोकून पतीला हिंट दिली आणि पतीला ती अडचणीत असल्याचा अंदाज आला आणि तात्काळ त्याने पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली त्यानंतर प्रकरणात पोलिसात पोहोचलेले आहे.