पोस्टरवरील मजकुराने कॉलेज झालं अलर्ट , तरुणी तर हादरल्याच ..

Spread the love

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर इथे एका महाविद्यालयात हातात पोस्टर घेऊन फिरणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून श्रीराम कॉलेजमधील हे प्रकरण आहे. आरोपी हा मुलींच्या घोळक्यामध्ये देखील असेच पोस्टर घेऊन फिरत होता आणि त्याच्यावरील मजकूर हा चांगलाच चर्चेत आला तो या वादाचे कारण ठरला.

आरोपी व्यक्ती हा याच कॉलेजचा विद्यार्थी असून तो कॉलेजमध्ये एक मजकूर घेऊन फिरत होता त्यावरील मजकूर हा वर्णद्वेषी वर्तन तसेच अप्रत्यक्षपणे देहविक्री करणाऱ्या रशियन मुलींबाबत सुचित करणारा होता. पोस्टरवर त्याने चक्क ‘ मुजफ्फरनगरमध्ये रशियन मुलगी कुठे मिळेल ‘ असे प्रिंट केलेले होते आणि हातात धरून हे पोस्टर घेऊन फिरत होता.

त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली आणि या तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी असभ्य भाषा आणि अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याच्या नादात त्याने हा प्रकार केला मात्र त्याच्या हातात बेड्या पडलेल्या आहेत.


Spread the love