सोशल मीडियावर सध्या एका घटनेची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानची राजधानी जयपूर येथील ही घटना आहे. एक एक व्यक्ती लग्न झाल्यानंतर त्याच्या नवविवाहित पत्नीला घेऊन सिनेमागृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी केलेला होता मात्र मध्यंतरात तो खाण्यापिण्यासाठी म्हणून काहीतरी आणण्यासाठी गेला आणि याचवेळी त्याची पत्नी प्रियकरासोबत फरार झालेली आहे.
पोलिसात प्रकरण गेल्यानंतर अखेर ही नववधू पोलिसात स्वतःहून हजर झाली आणि आपण पतीपासून खुश नाही म्हणून आपण गुपचूप निघून गेलेलो होतो असे म्हटलेले आहे. सिकर येथील रहिवासी असलेला एक तेहतीस वर्षीय तरुण आदर्शनगर पोलिसात पत्नी हरवल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी केलेला होता.
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे , 25 जून रोजी शहापूर येथील एका युवतीसोबत आपले लग्न झालेले होते. लग्नाला सात दिवस झाल्यानंतर आपण तिला घेऊन जयपूरच्या पिंक स्क्वेअर मॉलमध्ये फिरायला गेलेलो होतो त्यावेळी दुपारी पत्नीला चित्रपट पाहायला घेऊन गेलो आणि दीडच्या शोमध्ये इंटरवल असल्याकारणाने काहीतरी खाण्यापिण्यासाठी म्हणून आणण्यासाठी गेलो याच दरम्यान पत्नी पुन्हा आलो असता पत्नी जागेवर नव्हती.
आपण तपासाला सुरुवात केली त्यावेळी काही लोकांनी ही तेथून एक महिला टेम्पोमध्ये जाताना त्यांना दिसली त्यानंतर आपण तिचा शोध घेण्यासाठी बस स्थानकावर देखील गेलो मात्र ती आढळून आली नाही.दरम्यानच्या काळात पत्नी शहापूर येथील तिच्या माहेरी निघून गेलेली होती. माहेरी गेल्यानंतर तिने आपण आपल्या पतीपासून खुश नाही असे म्हणत आपण स्वतःहून आपल्या मर्जीने पत्नीला पतीला सोडून दिलेले आहे असे तिने सांगितलेले आहे. वैवाहिक जीवनात आपण आनंदी नाही असेही तिने म्हटलेले आहे .