महाराष्ट्रात एक अजब अशी घटना मुंबईत समोर आलेली असून जुहू चौपाटी येथे पोहायला गेलेल्या एका रशियन डॉक्टरचे कपडे आणि मोबाईल पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी समोर आलेला आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर किरील अगोरीच ( वय 33 ) हे अंधेरीच्या बॉलीवूड हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून राहत असून ते रशियन नागरिक आहेत . दोन महिन्यांपासून ते मुंबईला आलेले असून त्यांना मद्यपानाचे देखील व्यसन आहे. मद्यपान केल्यानंतर अनेकदा जुहू चौपाटीवर पोहायला ते जात असत आणि अशाच पद्धतीने 14 जुलै रोजी दुपारी त्यांनी मद्यप्राशन केले आणि जुहू चौपाटीच्या समुद्रात ते उतरले.
समुद्रात उतरण्याआधी त्यांनी त्यांचे कपडे आणि मोबाईल बीचवर काढून ठेवलेले होते आणि समुद्रातून ते लक्षदेखील ठेवून होते मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले आणि तासाभरानंतर पोहून आल्यावर त्यांचे कपडे आणि मोबाईल गायब झालेला होता सोबतच त्यांचे कपडे देखील घेऊन आरोपीने पलायन केलेले होते
समुद्रात पोहून देखील त्यांचे दारू उतरलेली नव्हती त्यावेळी चौपाटीवर आल्यावर काय करावे हे त्यांना कळत नव्हते म्हणून अखेर ते आहे त्या कपड्यांवरच हॉटेलमध्ये निघून गेले आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सांताक्रुज पोलीस ठाण्यात धाव घेत अनोळखी चोराच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे . पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.