‘..तर आयुष्यात आलाच तरी कशाला ? , लग्नमंडपातच नवरीने फोडला टाहो

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून बिहारच्या भागलपूर येथील ही घटना आहे. लग्न सोहळ्यासाठी सर्व आप्तेष्ट आणि कुटुंबीय जमलेले असताना अचानकपणे नवविवाहित वधू वराच्या मृत्यूनंतर विधवा झालेली आहे. भागलपुर येथील ही घटना असून खंजरपूर इथे राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या विनीत प्रकाशचे झारखंडमधील पश्चिम सिंह भूमी येथे राहणाऱ्या आयुषीसोबत लग्न झालेले होते.

लग्न लागल्यानंतर वधूला सासरी पाठवण्यासाठी अवघे काही मिनिट शिल्लक राहिलेले असताना अचानकपणे वराचा मृत्यू झाला त्यानंतर वधूची रडून रडून वाईट अवस्था झालेली होती. ‘ तुला माझ्यासोबत राहायचेच नव्हते तर तू माझ्या आयुष्यात आलाच तरी कशाला ‘ असे म्हणत तिने मांडवातच टाहो फोडलेला होता.

लग्न लागल्यानंतर नवरदेवाच्या छातीत अचानकपणे तीव्र वेदना झाल्या आणि खुर्चीवरून तो खाली पडला. कुटुंबीयांनी त्याला मायागंज रुग्णालयात नेले मात्र तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले त्यानंतर दोन्ही कुटुंबात एकच गोंधळ उडाला आणि नवरी असलेली आयुषी हिला ही बाब समजल्यानंतर तिने जागीच टाहो फोडला . आयुषी ही देखील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असून सर्व काही व्यवस्थित असताना अचानकपणे नियतीने खेळ केला आणि आयुषी हिच्यापासून विनीत प्रकाश याला तोडले. सदर घटनेनंतर दोन्ही कुटुंबात शोककळा पसरलेली आहे.


Spread the love