पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर धर्मांतर करून निकाह करणाऱ्या अंजू हिला पाकिस्तानमधील एका उद्योगपतीने भूखंड भेट दिलेला आहे. अंजू थॉमस हिने तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये धाव घेतली होती. संबंधित उद्योजकाने तिला एक डिमांड ड्राफ्टदेखील दिलेला असून त्यावरील रकमेची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. उद्योगपती मोहसीन खान अब्बासी हे तिची भेट घेण्यासाठी खैबर पख्तुन्वा इथे गेलेले होते.
मूळची राजस्थान येथील रहिवासी असलेली अंजू थॉमस ही गेल्या आठवड्यात वाघा बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये दाखल झालेली होती. विवाहित असलेली अंजु हिने तिच्या पतीला आपण जयपूर इथे जात आहोत असे सांगितले मात्र ती डायरेक्ट पाकिस्तानमध्ये गेल्यानंतरच या प्रकरणाची चर्चा झाली. पुढील दोन दिवसात आपण भारतात पुन्हा येणार आहोत आपण सीमा हैदर सारखे नाही असे म्हणत तिने सुरुवातीला म्हटले होते मात्र त्यानंतर तिने काही तासात धर्मांतर करून तिचा प्रियकर नसरुल्लाह याच्यासोबत निकाह केलेला आहे.
पाकिस्तान स्टार ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ मोहसीन खान अब्बास यांनी तिची भेट घेतली आहे . तिने आपले नाव आता फातिमा केलेले असून दुसऱ्या देशातून आलेल्या महिलेने इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळे तिला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे. पाकिस्तानमध्ये तिला काही कमी पडू देणार नाही असे देखील ते यावेळी म्हणाले. त्यांनी तिला भूखंड भेट देऊन स्वतःच्या कंपनीत नोकरीचे देखील आश्वासन दिलेले आहे.