गोवा म्हणजे स्वस्तातली दारू बिकिनी आणि बीच असे चित्र सोशल मीडियावर रंगवणाऱ्या एका तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला होता मात्र या व्हिडिओलाबद्दल संतप्त झालेल्या गोव्याच्या नागरिकांनी तिच्या विरोधात कारवाईची मागणी केली . सदर प्रकरण वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांच्यापर्यंत देखील पोहोचले आणि अखेर या तरुणीने याप्रकरणी माफी मागितलेली आहे. गोव्याची बदनामी करण्याचा माझा उद्देश नव्हता असे म्हणत तिने गोयंकरांची माफी मागितली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मोनालीसा घोष असे या तरुणीचे नाव असून इंस्टाग्रामवरती ती मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे. तिने गोव्याबाबत एक व्हिडिओ शेअर करताना गोव्यातील झोमॅटोवर फक्त दारू मिळते. चहा पिल्यावर दंड आकारला जातो आणि कपडे खरेदीला जावे तर फक्त बिकिनीच मिळते अशा आशयाचा व्हिडिओ तिच्या थॉट फुल गर्ल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला होता.
तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला मात्र यामुळे गोव्यात राहणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यानंतर तिने मी काही दिवसांपूर्वी गोव्यात गेलेले होते त्यावेळी मी बीच चर्च अशा ठिकाणी अनेक कॉमेडी व्हिडिओ बनवले होते त्या व्हिडिओत काही आक्षेपार्य शब्द होते याची मला आता जाणीव होत आहे मात्र गोव्याची बदनामी करण्याचा माझा उद्देश नव्हता असे म्हणत गोव्यातील नागरिकांची मी मनापासून माफी मागत आहे असे म्हटलेले आहे .