चक्क आयएएस अधिकारीच निघाला बनावट , खऱ्या अधिकाऱ्याला समजलं अन..

Spread the love

देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून आपण आयएएस अधिकारी आहोत अशा सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका बनावट अधिकाऱ्याला जबलपूर पोलिसांनी अटक केलेली आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार , राहुल गिरी असे या तरुणाचे नाव असून नरसिंगपूर येथील आपण जिल्हाधिकारी आहोत असा दावा त्याने केलेला होता. त्या संदर्भात त्याने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या. नरसिंगपूरचे खरोखरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले. दरम्यानच्या काळात राहुल गिरी याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तसेच इतर काही मोठ्या पदावरील नेत्यांसोबत एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून फोटो बनवत ते पोस्ट केलेले होते.

आयएएस अधिकारी आहोत असे सांगत त्याने फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने एक आलिशान कार भाड्याने घेतली होती आणि त्यावर आरोग्य अतिरिक्त सचिव असे देखील लिहिलेले होते. जबलपूर इथे सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने त्याने एका तरुणाची फसवणूक देखील केली. जबलपूरच्या तिलवाडा भागात शास्त्रीनगर इथे राहून तो एका खाजगी लॅबमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होता.

राहुल जेव्हाही बाहेर पडायचा त्यावेळी तो आलिशान कारमधून बाहेर पडायचा. त्याच्या गाडीवर अतिरिक्त सचिव आरोग्य मध्यप्रदेश सरकार आणि आरोग्य संघटनेचे अध्यक्ष यांची नेमप्लेट लावलेली होती. त्याला आयएएस अधिकारी व्हायचे होते पण तो यूपीएससी परीक्षा करू शकला नाही. अभ्यासात तो हुशार नव्हता त्यामुळे मी बीएससी पूर्ण केल्यानंतर त्याने जबलपूरमध्ये खाजगी नोकरी सुरु केली आणि याच दरम्यान फोटो एडिटिंग शिकला. त्याचा वापर करत त्याने हा सर्व प्रकार केल्याचे समोर आलेले असून सोशल मीडियावर तो आयएएस राहुल गिरी असे सांगत सर्व नागरिकांना शुभेच्छा देत असायचा.


Spread the love