महाराष्ट्रातील आरोग्य सुव्यवस्थेची परिस्थिती कोरोना काळात चांगलीच समोर आलेली होती त्यानंतर काही जुजबी बदल करण्यात आले मात्र अद्यापदेखील ग्रामीण पातळीवर योग्य ती वैद्यकीय मदत वेळेत मिळत नाही असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथे समोर आलेला असून ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाच्या कमरेला इंजेक्शन देताना सुई त्याच्या शरीरात घुसलेली आहे अखेर उपचारासाठी त्याला ऍडमिट करून घेण्यात आले आणि त्यानंतर ही सुई ऑपरेशन करून काढण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार , संदीप आत्राम ( वय 36 ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो ट्रकचालक म्हणून काम करतो. एक ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास उपचारासाठी तो शासकीय रुग्णालयात आलेला होता त्यावेळी त्याला तपासल्यानंतर डॉक्टरांनी इमरान नावाच्या एका कंपाउंडरला कमरेला इंजेक्शन देण्यास सांगितले मात्र इंजेक्शन देताना औषधाच्या दबावाने सुई सटकली आणि बाहेर पडून संदीपच्या शरीरात घुसली. सदर प्रकार रुग्णालयाचे डॉक्टर विजय कळसकर यांना कळाला आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ संदीप यांना ऍडमिट करून घेतले. दोन ऑगस्ट रोजी सिटीस्कॅन केले त्यामध्ये सुई आत अडकल्याचे लक्षात येताच शस्त्रक्रिया करून सुई काढून टाकण्यात आली.