मुलगा अमेरिकेत राहिला , किडे पडून सोसायटीत दुर्गंधी सुटली अन..

Spread the love

अनेक जणांना आपली मुले परदेशात जावेत असे वाटत असते . परदेशात गेल्यानंतर भरभक्कम नोकरी आणि सुखी आयुष्य असे काहीसे चित्र प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी पाहतो मात्र मुलगा परदेशी गेल्यानंतर त्याचा संपर्क खूप कमी होतो आणि भारतात राहिलेल्या आई-वडिलांकडे पाहण्यासाठी कोणी नसते असेच एक प्रकरण सध्या मुंबईत समोर आलेले असून शिवडीमधील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये 67 वर्षी आजोबांचा मृतदेह आढळून आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , उदय अनंत भट असे मयत व्यक्ती यांचे नाव असून हृदयविकाराचा झटका आला आणि खुर्चीमध्येच त्यांनी प्राण सोडले. घरात कोणीही नसल्याने दुर्गंधी आल्यानंतरच हे प्रकरण समोर आलेले आहे. एका खाजगी कंपनी मधून निवृत्त झालेले उदय हे शिवडी येथील जुबिली हाईट्स येथील पंधराव्या मजल्यावर भाडेतत्त्वावर राहायला होते . एक मुलगा मुलगी आणि पत्नी असे त्यांचे कुटुंब होते .

मुलगा अमेरिकेत असतो तर मुलगी बोरीवली परिसरात राहते . गेल्या काही वर्षांपासून त्यांना गँगरीनचा त्रास सुरू झालेला होता त्यामुळे घराबाहेर पडणे देखील जवळपास बंदच होते. सोमवारी रात्री घरातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली म्हणून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी खुर्चीमध्येच उदय भट हे मयत अवस्थेत आढळून आलेले होते. त्यांच्या शरीरावर अक्षरशः किडे पडण्यास सुरुवात झालेली होती. मृतदेह नेण्यास देखील रुग्णवाहिकेने त्यामुळे नकार दिला मात्र पोलिसांनी अखेर रुग्णवाहिका आम्ही साफ करून देऊ असे आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे.


Spread the love