सोशल मीडियावर पुन्हा एकदा बांगलादेशच्या एका सोशल मीडिया स्टारची जोरदार चर्चा सुरू असून हिरो आलम असे त्याचे नाव आहे. हिरो आलम हा एकेकाळी केबल व्यावसायिक होता याच दरम्यान त्याला सेलिब्रिटी बनण्याची इच्छा झाली आणि त्याने बॉलीवूडच्या काही गाण्यांवर स्वतःचे व्हिडिओ बनवलेले होते . त्याच्या रंगावरून त्याच्यावर सोशल मीडियात मोठी टीका झाली मात्र सध्या बांगलादेशमधील तो मोठा सेलिब्रिटी बनलेला आहे. सध्या तो अडचणीत आलेला असून पोलिसांनी त्याला पकडून तुरुंगात डांबले होते.
उपलब्ध माहितीनुसार , हिरो आलम याच्यावर खराब गाणी गायल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याची आठ तास चौकशी केली. सातत्याने तो खराब गाणे गातो त्याने यापुढील काळात अशी गाणी गाऊ नयेत असे पोलिसांनी त्याला सांगितलेले असून अटकेत पोलिसांनी आपला छळ केलेला आहे असे त्याचे म्हणणे आहे . त्याच्या यूट्यूब चैनलवर 14 लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबर असून त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे तो चर्चेत आलेला आहे.
काही नागरिकांनी त्याच्या विरोधात तक्रार केलेली होती काही जुनी शास्त्रीय बांगलादेशी गाणी तो ज्या पद्धतीने गातो त्या पद्धतीने ती गाऊ नयेत कारण तो अत्यंत वाईट पद्धतीने गातो असा आरोप या नागरिकांनी त्याच्यावर केलेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याचा माफीनामा घेतला आणि त्यावर स्वाक्षरी करून घेतली.
हिरो आलम याने या प्रकरणी बोलताना , ‘ पोलिसांनी सकाळी सहा वाजता मला ताब्यात घेतले आणि आठ तास तुरुंगात ठेवले. त्यांना मी विचारले की मला अटक का केलेली आहे ? त्यावेळी त्यांनी सांगितले की नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेश राष्ट्रीय कवी काझी नसरुल इस्लाम यांची गाणी तू ज्या पद्धतीने गातो त्यामुळे या गाण्यांचे विडंबन होत असून अशी गाणी तू यापुढे गाऊ नयेत असे तू लिहून दे त्यानंतर आपण यापुढे अशी गाणी गाणार नाही असे पोलिसांना लिहून दिलेले असून पोलिसांनी आपला छळ केलेला आहे ‘, असेही म्हटलेले आहे.