सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम राहिलेला नाही .अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली असून चक्क एका पबच्या बाथरुममध्ये कपलने शारीरिक संबंध ठेवले मात्र या दरम्यान त्यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवत पबच्या बाथरूमचे देखील मोठे नुकसान केले. घटना अमेरिकेतील फ्लोरिडा इथे घडलेली असून प्रकरण पोलिसात गेल्यावर महिलेला अटक करण्यात आली आणि तिला दंड ठोठावण्यात आला.
डेली स्टारने याबद्दल वृत्त दिलेले असून महिला आणि तिच्या मित्राला झालेल्या प्रकारानंतर तत्काळ तेथून हाकलून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. महिलेने प्रथम बाथरुमचे सिंक अन्य काही कारणाने तुटले असावे असे देखील बनाव केला होता तो देखील खोटे असल्याचे निदर्शनात आले. शारीरिक संबंध ठेवताना त्यांना आपण दुसऱ्याच्या प्रॉपर्टीचे नुकसान करत आहोत याचे भान राहिले नाही आणि त्यांनी तेथे बसवलेले सिंक देखील तोडले आणि पब मालकाचे बरेच नुकसान केले. हाकलून दिल्यावर त्यांची माहिती मिळवून प्रकरण अखेर पोलिसात गेले.
पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने कबूल केले की, ती तिच्या मित्राचे बाथरूममध्ये शारीरिक संबंध ठेवत होती आणि यादरम्यान तेथील सिंक तुटला मात्र तो सिंक कसा तुटला याबाबत अधिक माहिती देण्यास महिलेने नकार दिला आहे . सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करताना महिला अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती का ? तिचे मानसिक आरोग्य बिघडले नाही ना, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र घटनेच्या वेळी ती पूर्णपणे नशेत होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.