अवघ्या एक दिवसाच्या अर्भकाला कुत्र्यांजवळ सोडून फरार मात्र दुसऱ्या दिवशी..

Spread the love

माणसाचा सगळ्यात जवळचा पशु म्हणून कुत्रा याची गणना करतात ते काही उगाच नाही . इमान की गोष्ट खरोखर कुत्र्यांकडून शिकण्याची गोष्ट आहे. अशीच एक घटना छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात घडलेली असून चक्क व्यक्तीने कुत्र्यांजवळ आपल्या नवजात बाळाला सोडून पळ काढला . स्त्री जातीचे हे अर्भक होते मात्र कुत्र्यांनी अक्षरश: तिला जीव लावत आपल्या इतर पिलांप्रमाणेच तिचा रात्रभर सांभाळ केला आणि बाळाला सुरक्षित ठेवले.

उपलब्ध माहितीनुसार, छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातील लोरमी परिसरात ही घटना उघडकीस आली असून एक दिवसाच्या स्त्रीजातीच्या नवजात अर्भकाला कुणी अज्ञाताने गावातील आडोशाच्या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लांच्या बाजूला फेकले. कुत्री या बाळाला खाऊन टाकतील आणि आपले पाप झाकले जाईल अशी कदाचित या व्यक्तीची अपेक्षा असावी मात्र कुत्र्यांनी चक्क रात्रभर मुलीला काहीही न करता सांभाळले आणि पूर्णपणे सुरक्षित ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थांनी सकाळी एका बालकाला कुत्र्याच्या पिल्लांशेजारी झोपलेले पाहिले आणि या प्रकाराची पोलिसांना कल्पना देण्यात आली. पोलिस या नवजात अर्भकाला घेऊन त्वरित मातृ शिशू रुग्णालयात पोहोचले. नवजात मुलीवर या केंद्रात प्राथमिक उपचार केले गेले आणि चाइल्ड केअर मुंगेली येथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले. अवघ्या एक दिवसाच्या या बाळाची कुत्र्यांनी काळजी घेतल्याने प्राण्यांमध्ये माणसापेक्षा जास्त मानवता असल्याचे यावेळी दिसून आले. आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून सध्या चौकशी सुरू असल्याचे समजते.


Spread the love