26 11 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफीज सईद सध्या प्रचंड अडचणीत असून हाफिज याचा मुलगा कमालुद्दीन सईद हा 26 सप्टेंबर पासून गायब झालेला आहे. तो कुठे गेला त्याचे काय झाले याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नसल्याने हाफिज हा रडून रडून बेहाल झालेला आहे. कमालुद्दीन याचे कारमधून काही जणांनी अपहरण केल्याची माहिती आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा हाफिज याच्या सेवेसाठी सज्ज असून कमालुद्दीन याचा शोध सुरू आहे मात्र तो हाती आलेला नाही .
शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर हाफिज याचा मुलगा कमालुद्दीन याचा मृतदेह पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आढळल्याच्या शेकडो पोस्ट फिरत होत्या त्यामुळे हाफिज सईद आणखीनच त्रस्त झालेला असून आपला मुलगा सुरक्षित राहावा म्हणून सध्या प्रार्थना करत आहे.
26 सप्टेंबर रोजी हाफिज याचा मुलगा कमालुद्दीन अचानकपणे गायब झाल्याची बातमी आली. अतिरेकी असलेला हाफिज सईद याच्या मुलाचे पेशावर मध्ये कुणीतरी अपहरण केले. स्थानिक मीडिया हाऊसने देखील या संदर्भाची पुष्टी केली आणि कमालुद्दीन याचे कारमधील काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती दिली. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा देखील अद्यापपर्यंत त्याचा शोध लावू शकलेली नाही.
पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयाने अतिरेकी हाफिज सईद याला 31 वर्षांची शिक्षा सुनावली होती सोबतच त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचे देखील आदेश दिलेले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी असलेल्या लष्करी तोयबाचा हा सईद संस्थापक असून 26 11 च्या मुंबई हल्ल्याचा देखील तो मास्टरमाइंड आहे. वृत्त लिहीपर्यंत तरी कमालुद्दीन याच्याबद्दल खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.