महाराष्ट्रात एक अजब प्रकार सध्या सांगलीतील इस्लामपूर इथे समोर आलेला असून एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींनी कॉलेजच्या दारातच एकमेकांच्या झिंज्या पकडत जोरदार मारामारी केलेली आहे.लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांचा हा प्रकार बराच काळ सुरू होता याच दरम्यान काही जागरूक नागरिकांनी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात व्हायरल करून दिला.
उपलब्ध माहितीनुसार , दोन्ही तरुणी वाळवा तालुक्यातील एका गावांमधील असून इस्लामपूर येथील एका महाविद्यालयात शिकत आहेत . एकाच वर्गात असल्याकारणाने त्यांची ओळख देखील होती आणि त्यांचा प्रियकर हा कॉलेज परिसरात कॉफी शॉप चालवतो. दोघी मिळून त्या कॉलेज परिसरातील कॉफी शॉप मध्ये जायच्या याच दरम्यान त्यातील एकीचे कॉफी शॉप वाल्यासोबतच प्रेम प्रकरण सुरू झाले.
जिला आपण कॉफी शॉप मध्ये घेऊन गेलो तिनेच आपला बॉयफ्रेंड आपल्यापासून हिरावून नेला अशी त्या तरुणीची धारणा झाली आणि त्यानंतर दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि हाणामारी चक्क कॉलेजच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली . कॉलेजच्या दारातच हा प्रकार घडल्यानंतर या प्रकरणाची प्राचार्यांना देखील माहिती देण्यात आली आणि प्राचार्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
अवघ्या काही मिनिटात निर्भया पथक तिथे पोहोचले आणि त्यानंतर प्राचार्यांनी दोन्ही मुलींना केबिनमध्ये बोलावत त्यांच्या पालकांना घेऊन येण्यास सांगितले . अवघ्या काही मिनिटात त्यांचे पालक देखील तिथे दाखल झाले त्यावेळी त्यांनी भांडणाचे कारण दुसरेच असल्याचे सांगितले मात्र झाल्या प्रकरणाची या कॉलेजमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती .