सोशल मीडियावर सध्या एका वकिलाची जोरदार चर्चा सुरू असून सर्वसामान्यपणे जास्त शिकलेला माणूस हा अनेकजण जास्त हुशार समजतात मात्र या वकिलाने काहीही शिक्षण नसताना चक्क न्यायालयात दाखल होऊन केसेस देखील लढवलेल्या आहेत . वकिलीचे काहीही शिक्षण नसताना त्यांनी केसेस लढवून जिंकलेल्या देखील असल्याने केनिया येथील या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार , ब्रायन मेवांडा जागी असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी एका हायप्रोफाईल लॉ फर्ममध्ये वकील म्हणून स्वतःची नोंदणी केली आणि त्यांच्या क्लायंटच्या एकूण 26 केसेस लढल्या आणि सर्व केसेस जिंकल्या. आपण वकील आहोत असा त्यांनी बनाव केला मात्र व्यावसायिक यश देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात मिळवले.
ब्रायन ज्या पद्धतीने न्यायालयासमोर युक्तीवाद करायचे त्यावरून न्यायाधीश यांना देखील ते वकील नाहीत याचा कधीही संशय आला नाही. कायद्याचा कुठलाही औपचारिक अभ्यास त्यांनी केलेला नव्हता. केनियाच्या लॉ सोसायटीने त्यांच्यावर संशय घेतला आणि त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार करताना त्यांनी स्वतःचे नाव वापरले नाही.
ब्रायन यांनी ज्या व्यक्तीचे नाव वापरले तो व्यक्ती इतरत्र काम करत होता मात्र जेव्हा त्याला खात्यात लॉगिन करण्यासाठी अडचणी येऊ लागल्या त्यावेळी त्यांनी लॉ सोसायटीशी संपर्क साधला त्यावेळी त्यांच्याच नावाने कुणीतरी वकील काम करत असल्याचे समोर आले. बनावट वकिल असलेले ब्रायन यांस सध्या ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी ज्या पद्धतीने प्रभावी युक्तीवाद करून आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे त्या सर्व फर्मने त्यांची सुटका करावी अशी मागणी न्यायालयाकडे केलेली आहे.