पुण्यामध्ये ऑनलाईन गेम खेळून दीड कोटी रुपये जिंकलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे प्रसारमाध्यमांमुळे चांगलेच चर्चेत आले मात्र ऑनलाइन गेम खेळून त्यांनी पैसे कमवल्यानंतर अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी ही कारवाई केलेली असून ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीचे आहे असे कारण त्यांना निलंबनासाठी देण्यात आलेले आहे .
उपलब्ध माहितीनुसार , सोमनाथ झेंडे जो ऑनलाइन गेम खेळले त्यावर काही राज्यात बंदी असून खेळ जोखमीचा असल्याकारणाने एक प्रकारे तो सट्टा ठरतो. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची उत्पन्नाची साधने कायदेशीर असावीत असा नियम असून कोणत्याही खेळ प्रकारात भाग घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे असते ती त्यांनी घेतलेली नव्हती. दुसरी बाजू अशी आहे की ऑन ड्युटी खेळ खेळणे हा देखील गैरवर्तुकीचा प्रकार असून त्याच्या आधारे झेंडे यांच्यावर ही कारवाई ही करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी अधिक काही बोलण्यास झेंडे यांनी सध्या नकार दिलेला आहे.