झाडावरून पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल , उद्यान पर्यवेक्षक पोलिसात

Spread the love

पुण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून विशेष म्हणजे हा गुन्हा तिने परिसरातील दहा झाडे तोडल्यावरून दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी नगर परिषदेची परवानगी न घेता तिने तिच्या घराच्या परिसरातील दहा झाडे तोडली .

उपलब्ध माहितीनुसार , पिंपरी नगर परिषदेचे उद्यान पर्यवेक्षक सिद्धेश्वर भगवान महाजन ( राहणार राजगुरुनगर ) यांनी याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल केलेला आहे . तळेगाव दाभाडे पोलिसात त्यांनी फिर्याद दिलेली असून संशयित महिलेने तळेगाव दाभाडे नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता ती राहत असलेल्या परिसरात नारळ आंबा डाळिंब बाभूळ प्राजक्त अशी एकूण दहा झाडे तोडली . महिलेला दंड देखील ठोठावण्यात आलेला होता मात्र तिने दंड भरला नाही म्हणून नगर परिषदेने पोलिसात धाव घेतलेली आहे .


Spread the love