रेमंड कंपनीच्या मालकाने बायकोला गेटबाहेर उभं केलं , घटस्फोटाची केली घोषणा

Spread the love

करोडपती नागरिक असल्यानंतर सर्व काही सुख सुविधा त्यांना असतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात त्यांना काही अडचणी येत नसाव्यात असा सर्वसामान्य माणसाचा समज असतो मात्र प्रत्यक्षात तसे नसते. प्रसिद्ध उद्योगपती आणि गारमेंट ग्रुप रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांनी त्यांची पत्नी नवाज मोदी हिच्यापासून विभक्त होण्याची घोषणा अखेर केलेली आहे.

सदर दांपत्याच्या लग्नाला बत्तीस वर्षे झाल्यानंतर ते वेगवेगळे होत असून 58 वर्षाच्या सिंघानिया यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ,’ आम्ही आता वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतलेला आहे असे सांगत ही दिवाळी पूर्वीसारखी राहणार नाही. मला वाटतं नवाज आणि मी इथून वेगवेगळे मार्ग स्वीकारू ‘ असे म्हटलेले आहे.

गौतम सिंघानिया यांनी 1999 मध्ये नवाज मोदी यांच्यासोबत लग्न केलेले होते त्यावेळी नवाज या 29 वर्षाच्या होत्या. लग्नाच्या आधी जवळपास आठ वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. नवाज या सध्या एक जिम चालवत असून सिंघानिया आणि नवाज यांना निहारिका आणि निसा अशा दोन मुली आहेत.

सिंघानिया आणि मोदी यांच्यात दिवाळी पार्टीवरून वाद सुरू झालेला होता. सिंघानिया यांनी त्यांच्या फार्म हाऊस वर पार्टी आयोजित केली त्यावेळी नवाज मोदी देखील तिथे आलेल्या होत्या मात्र त्यांना पार्टीत प्रवेशही देण्यात आला नाही. नवाज मोदी यांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तो आता सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे. व्हिडिओमध्ये नवाज म्हणत आहेत की त्या जे के ग्रामच्या बाहेर उभ्या होत्या आणि त्यांना आत जाऊ दिले नाही.

रेमंड लिमिटेड या कंपनीची मोठी उलाढाल असून रेमंड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती 11000 कोटी रुपयांची आहे . रेसिंग कारचे शौकीन असलेले सिंघानिया यापूर्वी देखील वादात सापडलेल्या असून सिंघानिया यांचे वडील विजयपत यांच्याशी देखील त्यांचे भांडण झालेले आहे. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड ग्रुपची स्थापना केलेली होती.


Spread the love