निम्म्या वयाच्या मुलासोबत निकाह , ‘ तो ‘ बायकोशेजारी झोपत नाही कारण..

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याची जोरदार चर्चा सुरू असून या चर्चेचे कारण म्हणजे या जोडप्याच्या वयातील असलेले अंतर हा आहे . पाकिस्तान येथील ही घटना असून 35 वर्षांची एक तरुणी अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर त्यांनी संसार देखील थाटला. तब्बल दुप्पट वयाच्या प्रेयसी सोबत संसार सुरू केल्यानंतर पाकिस्तानमधील एका यूट्यूब चैनलने त्यांची मुलाखत घेतलेली आहे.

सदर दांपत्याची कहाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या चॅनेलवर अशाच स्वरूपाचे विवाह झाल्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली जाते . 18 वर्षीय तरुणाचे नाव शहजाद असे असून तरुणीचे नाव कोमल असे आहे. दोघे एकमेकांचे लांबचे नातेवाईक असून शाळेत शिकत असल्यापासून त्याचे कोमलवर प्रेम होते असे त्यांनी म्हटलेले आहे.

शहजाद शाळेत शिकत होता तेव्हाच त्याचे कोमल तिच्यावर एकतर्फी प्रेम होते त्यातून त्याने त्याच्या घरच्यांचा मार देखील खाल्ला मात्र वयात इतका फरक असून देखील त्याने जिद्द सोडली नाही आणि अखेर दोघांनी निकाह करत सोबत राहायला सुरू केले. विशेष म्हणजे निकाह होऊन देखील शहजाद हा कोमल सोबत राहत नाही कारण तिच्यासोबत राहिल्यानंतर त्याला झोप येत नाही. शहजाद कोमलला पिंकी नावाने हाक मारतो तर कोमल शहजाद यास मिठू नावाने हाक मारते.

शहजाद आणि कोमल यांची प्रेम कहानी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली असून शहजाद याचा फोटो पाहिल्यानंतर तो अठरा वर्षाचा देखील नसावा त्याचे वय १३ ते १५ चा असावे अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत तर काहीजणांनी युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असे म्हणत काहीजणांनी अशी ही बातमी खरी आहे यावर देखील अविश्वास दाखवलेला आहे.


Spread the love