देशात एक अजबच प्रकरण समोर आले असून या प्रकाराची देशभर चर्चा व्हावी असेच हे प्रकरण असून नुकतेच लग्न झालेल्या एका महिलेने चक्क फक्त सहा महिन्यातच बाळाला जन्म दिल्याने सासरी एकच गोंधळ उडाला आणि ते मुलं आमच नाही असे सांगत सासरच्या लोकांनी महिलेला चक्क घराबाहेर काढलं मात्र कौटुंबीक न्यायालयाने सासू-सासऱ्यांची ऑनलाईन काउन्सलिंग करून हे कुटुंब तुटण्यापासून वाचवलं मात्र प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आल्यावर सासरचे देखील हैराण झाले आणि त्यांनी सुनेला पुन्हा वेलकम करत आपल्या घरात घेऊन तिला सॉरी देखील म्हटलं . मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या अशोकनगर येथील ही घटना समोर आली आहे.
कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी सांगितलं की, ‘ 30 मे 2020 रोजी महिलेचा गुना येथील एका तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर 10 डिसेंबर रोजी तिने मुलाला जन्म दिला. ६ महिन्यांतच मूल झाल्याने सासरे आणि शेजारी सगळे तिच्यावर घाणेरडे आरोप करू लागले. मात्र पतीला सत्य माहीत असल्याचं तरुणी सांगत होती मात्र तिचे कोणीच ऐकून घेतले नाही अन सासरच्या लोकांनी तिला घरातून बाहेर काढून माहेरी पाठवून दिले. .
हतबल झालेल्या महिलेने पतीला संपर्क केला असता पतीने देखील तिचे बोलणे ऐकून घेण्यास नकार दिला अखेर समुपदेशन पथकाने गुना येथे राहणाऱ्या महिलेच्या पतीशी स्वतः संपर्क साधला मात्र तरीही पती ऐकून घेण्याच्या भूमिकेत नव्हता मात्र तरुणीने पुढे समुपदेशन पथकाला माहिती दिली की, याच व्यक्तीने त्याच्या घरच्यांसमोरच सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता मात्र त्याआधी देखील त्याने मंदिरात माझ्याशी लग्न केलं होतं आणि माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते त्यातून हा प्रकार झालेला आहे .
समुपदेशन टीमचं बोलणं ऐकल्यानंतर पतीला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने हे बाळ त्याचेच असल्याचे मान्य केले आहे. आपण समाज आणि कुटुंबाच्या भीतीने आपण मान्य करत नव्हतो, असं तो म्हणाला. पतीने नंतर ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगितली आणि सासूलाही आपल्या चुकीची जाणीव झाली अखेर सासू सुनेच्या घरी गेली आणि आपल्या सुनेला तसंच नातवाला आपल्या घेऊन आनंदात आपल्या घरी आली.
सूत्रांच्या माहितीनुसार सदर पतीची या महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाली होती अन काही दिवसांतच त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं.2020 साली मे महिन्यात त्यांनी सर्वांसमोर लग्न केल होत मात्र त्याआधीच त्यांनी मंदिरात लग्नगाठ बांधली आणि त्यातून पुढे जात त्यांनी संबंध ठेवले होते. डिसेंबर 2020 मध्येच महिलेनं बाळाला जन्म दिला. मात्र कुटुंबीयांच्या गैरसमजामुळे महिलेला मानसिक त्रासाला सामोरे जावं लागलं.