मद्यप्रिय संघर्ष समितीचा विधानसभेवर मोर्चा , मागण्या असल्या भन्नाट की..  

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका मोर्चाची जोरदार चर्चा सुरू असून कर्नाटक येथील हे प्रकरण आहे. कर्नाटक मधील मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीने चक्क विधानसभेसमोरच अधिवेशन काळात आंदोलन करण्यात आले असून सर्व मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेले होते . मद्यप्रिय  संघर्ष समितीने केलेल्या मागण्या देखील वाचण्या सारख्या आहेत. 

काय आहेत मद्यप्रिय संघर्ष समितीच्या मागण्या

  • दारुडा शब्दावर बंदी आणून मद्यप्रिय म्हणा
  • 31 डिसेंबर रोजी मद्यप्रिय दिवस घोषित करा
  • मद्य प्रिय व्यक्तींना विमा योजना लागू करा
  • मद्य प्रिय व्यक्तींच्या मुलांना शिक्षण द्या
  • मद्यविक्रीतून येणाऱ्या नफ्यातून दहा टक्के अनुदान मंजूर करावे
  •  मद्यप्रेमी व्यक्तींसाठी विशेष भवनाची उभारणी करण्यात यावी
  • मद्यप्रिय व्यक्तींवर कुठलेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत 
  • मद्य प्रिय व्यक्तींना बारमध्येच झोपण्यासाठी जागा करून देण्यात यावी
  • मद्यपान केल्यानंतर आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचे उपचार करण्यासाठी शासनाने मदत करावी
  • मद्यप्रेमी व्यक्ती साठी स्वतंत्र निगम स्थापित करण्यात यावा

Spread the love