कोणतेही व्यसन एकदा लागले की सहसा सुटत नाही हेच खरे , असेच काहीसे अमेरिकेतील एका महिलेसोबत झाले असून या महिलेला काही वर्षांपूर्वी तिला खडू खाण्याची सवय लागली होती. काही दिवसांनी तिचं खडू खाण्याचं प्रमाण वाढत गेलं आणि त्यानंतर तिला भिंतीचा वास आणि चव आवडू लागली. भिंतीचा स्पर्शही तिच्या जिभेला हवाहवासा वाटू लागला मग तिने भिंतीवरचा चुना खरडून खायला सुरुवात केली. निकोलस असे या महिलेचे नाव असून ती अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहते .
उपलब्ध माहितीनुसार, निकोलसची आई पाच वर्षांपूर्वी वारली आणि या घटनेचा तिला जबर धक्का बसला. याचदरम्यान तिने खडू खाण्यास सुरुवात केली . तिला खडूची चव इतकी आवडली की तिने खडूचे बॉक्सच फस्त केले. आपण करतोय हे चुकीचे आहे हे समजल्यावर तिने तिने घरात खडू आणणंच बंद केलं मात्र तरी देखील तसला साधर्म्य असलेला पदार्थ खायची तिची सवय काही कमी होत नव्हती .
मग ती आपल्या घरातील भिंतीपाशी जाऊ लागली आणि भिंत चाटू लागली. भिंतीचा चुना मिश्रीत वास आणि त्याचा जिभेला होणारा स्पर्श या दोन्ही गोष्टी तिला हव्याहव्याशा वाटू लागल्या. आता निकोलस दिवसातून सहा वेळा भिंत खाते . एक प्रकारचा हा मानसिक आजार असला तरी सर्वसामान्य माणसं मात्र त्यामुळे वैतागले आहेत. अनेकांनी खर्च करून सजवलेल्या भिंतींचं निकोलस नुकसान करत असल्यामुळे तिला आपल्या घरी बोलवायलाही नकार देत आहेत. निकोलसने ही सवय वेळेत सोडली नाही, तर तिच्यासाठी हे जीवघेणं ठरू शकतं, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.